शिक्रापुरात चोरट्याने अभियंत्याचा लॅपटॉप पळविला

शिक्रापूर – येथील चाकण चौकात उभ्या असलेल्या एका कारच्या दरवाजाची काच फोडून चोरट्यांनी एका अभियंत्याचा लॅपटॉप भरदिवसा पळविल्याची घटना शनिवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत मनीष कैलास मुळे (रा. मुळेवाडी, न्हावरा रोड, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार मनीष मुळे हे त्यांच्या काही कामानिमित्त सणसवाडी येथे गेले होते. तेथून पुन्हा येत असताना त्यांनी त्यांच्या जवळील (एमएच 12 सीसी 6666) मध्ये त्यांचा लॅपटॉप असलेली बॅग ठेवली. मनीष हे त्यांचा चुलतभाऊ गणेश मुळे याचे सोबत शिक्रापूर-चाकणचौकात रस्त्याच्या बाजूला कार लावून एका दुकानात मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेले. त्यांनतर काही वेळातच ते त्यांच्या कारजवळ आले असता त्यांना कारच्या एका बाजूच्या मागच्या दरवाजाची काच फुटलेली दिसली. त्यांनतर पहिले त्यांना आतमध्ये ठेवलेली लॅपटॉप बॅग दिसली नाही. त्यामुळे त्यांचा लॅपटॉप चोरी गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मुळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात लॅपटॉप चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)