शिक्रापुरात कचरा फेकणाऱ्यांना गुलाब पुष्प

शिक्रापूर-शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर-पाबळ रोडवरील बोरमळा व कस्तुरी कॉलेज परिसरात कचरा फेकून घाण पसरवणाऱ्या बेशिस्त हॉटेल व्यावसायिक व नागरिकांना येथील तरुणांनी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करत कचरा न टाकण्याबाबत समज दिली आहे.
शिक्रापूर येथे पाबळ रोडच्या कडेला हॉटेल व्यावसायिक, चिकन व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत असतात. त्यामुळे येथून जवळच बोरमळा व कस्तुरी कॉलेज परिसरात असलेल्या लोकवस्तीतील लोकांना येथील दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा येथील लोकांनी स्वखर्चाने कचरा उचलला आहे. अनेकदा येथे कचरा न टाकण्याबाबत फलकदेखील लावलेले आहेत. तरी सुद्धा रात्रीच्या वेळेस या भागातील नागरिक व व्यावसायिक गुपचूपपणे येथील रस्त्याच्या कडेला कचरा टाकत असतात; परंतु या लोकांना पकडण्यासाठी येथील तरुणांनी गांधीगिरीचा उपाय निवडला आणि शिक्रापूर येथील सौरभ सासवडे, अविनाश करंजे, मंगेश भुजबळ, निलेश भुजबळ, कल्याण गायकवाड, महेश कळमकर, समाधान गायकवाड यांनी रात्रीच्या वेळेस कचरा टाकण्यासाठी आलेल्या नागरिकांना पकडून त्यांना गुलाबपुष्प देऊन येथे पुन्हा कचरा टाकू नये म्हणून विनंती केली आहे. त्यामुळे शिक्रापूर येथील युवकांनी लढविलेल्या या शकलीची चर्चा संपूर्ण तालुक्‍यात झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)