शिक्रापुरात कंटेनरच्या धडकेत मुलीचा मृत्यू

शिक्रापूर -येथील पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या मलठण फाटा येथे भाजी आणायला चाललेल्या व्यक्तीच्या दुचाकीस कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातात बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाली असल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
दीपिका पोपट चव्हाण (वय 12) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे, तर तिचे वडील पोपट दगडू चव्हाण (दोघेही, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) हे जखमी झाले आहेत. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील पोपट दगडू चव्हाण व त्यांची मुलगी दीपिका दगडू चव्हाण हे भाजी आणण्यासाठी शिक्रापूर येथील मलठण फाटा येथे त्यांच्या जवळील दुचाकीवरून (एमएच 12 एमसी 0574) चालले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीस ठोकर दिली. यावेळी दुचाकी खाली पडली व दुचाकीवरील मुलगी व वडील जखमी झाले आणि कंटेनरचालक पळून गेला येथील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; परंतु डोक्‍याला जास्त मार लागल्याने दीपिका दगडू चव्हाण वय 12 वर्षे हिचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर पोपट दगडू चव्हाण हे जखमी झाले आहे. याबाबत बबन दगडू चव्हाण यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)