शिक्रापुरात ओ स्पोर्ट खेळाचे राज्यस्तरीय शिबीर

शिक्रापूर  -शिक्रापूर (ता. शिरूर) येथे ओ-स्पोर्ट अर्थात मार्शल आर्ट या खेळाचे आयोजन ओ स्पोर्ट असोशिएशन महाराष्ट्र यांनी शिक्रापुर येथे आयोजित केले होते यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांतील सुमारे दीडशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या या खेळाच्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी राष्ट्रीय ओ स्पोर्ट फाऊंडेशनचे महासचिव शिवकुमार, प्रशिक्षक नितिन कुमार, रवी पंवार, रंजित सिंह, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे, महासचिव प्रमोद फुलसुंदर, प्रशांत उबाळे, प्रमोद पाठक, अर्चना फुलसुंदर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्य संघटनेचा प्रमुख उद्देश या खेळाचा प्रचार अन्‌ प्रसार करुन महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावेत राज्य तसेच देशाचा नावलौकिक वाढवावा असा असल्याचे महासचिव प्रमोद फुलसुंदर यांनी सांगितले. या खेळाच्या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रातील 17 जिल्हा प्रतिनिधी तसेच सुमारे 150 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यावेळी सर्व खेळाडूंना सहभाग बद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. तर यावेळी हा खेळ कुस्ती आणी बॉक्‍सिंग यांचा समन्वय असून सुलतान, ब्रदर्स तसेच अनेक चित्रपट या खेळा संबंधित असून नवीन येणाऱ्या खेळाडूंना या क्षेत्रात आपली एक प्रतिमा तयार करता येईल, तसेच स्त्री संरक्षण हा आज फक्त विषय होऊन बसला असला तरी तरुणींनी सहभागी होऊन निर्भीड समाज उभा केला पाहीजे, असे राष्ट्रीय महासचिव शिवकुमार यांनी सांगितले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब भुजबळ, संजय थोरवे, प्रदीप भुजबळ, बाळासाहेब काळोखे, नवनाथ विरोळे, बाळासाहेब नर्के, आकाश मिसाळ, प्रतिक पंडीत, शाहीद बागवान, सुभाष दुधे, रोहन शेलार, प्रतिक्षा नर्के, वेदीका पंडित, क्षितिजा पाठक, सागर दरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परेश महाजन यांनी केले तर संघटनेचे तांत्रिक संचालक प्रशांत उबाळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)