शिक्रापुरात एटीएममध्ये आढळला घोणस साप

शिक्रापूर, दि. 20 (वार्ताहर) -येथील पाबळ चौकामध्ये असलेल्या पवना सहकारी बॅंकेच्या एटीएममध्ये आज सकाळच्या सुमारास अतिविषारी असा घोणस जातीचा साप आढळून आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे असलेल्या पवना सहकारी बॅंकेच्या एटीएम मध्ये आज सकाळच्या सुमारास साप असल्याचे येथे साफसफाई करणारी महिला व पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना दिसून आला. यावेळी पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची सकाळ सकाळ चांगलीच तारांबळ झाली. यानंतर येथील उद्योजक अजय जगताप यांनी तळेगाव ढमढेरे येथील सर्पमित्र गणेश टिळेकर यांना सांगितले असता टिळेकर यांनी तातडीने त्या ठिकाणी येऊन एटीएम मध्ये असलेल्या सापाला पकडून बाहेर काढले, सर्पमित्राने सापाला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला; परंतु बराच वेळ एटीएममध्ये साप असल्याने नागरिकांची पैसे काढण्यासाठी गैरसोय झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)