शिक्रापुरातून हॉटेल व्यावसायिक बेपत्ता

शिक्रापूर – येथील 44 वर्षीय हॉटेल व्यावसायिक तरुण राजेंद्र भालचंद्र करंजे अचानक बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी (दि. 23) घडली आहे. याबाबत राजेंद्र करंजे बेपत्ता झाल्याची फिर्याद त्याचा भाऊ राहुल भालचंद्र करंजे याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, राजेंद्र हा शिक्रापूर येथील नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करून त्यानंतर घरी आला आणि मला न्यायालयात जायचे आहे, असे सांगून गेला. त्यानंतर तो परत घरी आलाच नाही. त्यामुळे राजेंद्र करंजे यांचा सर्वत्र नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला त्याचा शोध लागला नाही. तसेच राजेंद्रला मोबाईलवर संपर्क न झाल्याने तो बेपत्ता झाला असल्याची फिर्याद त्याचा भाऊ राहुल भालचंद्र करंजे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. रंगाने काळा सावळा, केस काळे, डोळे काळे, अंगात काळ्या रंगाचा हाफ शर्ट व पांढऱ्या रंगाची पॅंट, वरचा दात पडलेला, उंची साडेपाच फुट, चष्मा आहे, असे राजेंद्र करंजे याचे वर्णन असून संबंधित व्यक्ती कोठे आढळल्यास शिक्रापूर पोलिसांशी 9822747624 तसेच 02137286333 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवहन पोलिसांनी केले आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)