शिक्रापुरातील महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल

महिलांच्या मागणीप्रमाणे सोय करणार
शिक्रापूर येथे सुरु केलेल्या पापड व्यवसायानंतर महिलांच्या मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर महिलांच्या मागणीमुळे आम्ही शेवई बनविण्याचे मशीन देखील खरेदी केले आहे. त्यामाध्यमातून आम्हां आठ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तर या पुढील काळामध्ये महिलांच्या मागणीप्रमाणे सर्व सोयी उपलब्ध करणार आहे, असे ज्योती अशोक पाटील आणि मंगल थोरात यांनी सांगितले आहे.

वेळेत होतेय बचत : व्यवसायास उत्तम प्रतिसाद

शिक्रापूर – येथील करंजेनगर येथे राहणाऱ्या काही महिलांनी एकत्र येत उद्योगात भरारी घेण्याचा निर्णय घेऊन गृहउद्योग सुरु केला आहे. त्यामुळे महिला स्वावलंबी बनत आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून या महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल केली आहे. यामुळे वेळेत बचत होत असून यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही माहिलांनी सांगितले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील करंजेनगर येथील ज्योती अशोक पाटील, संगिता पवार, वैशाली दानवे, मंगल थोरात, सारिका कोळपकर, मंगल माकणे, मधुमती तांबे आणि शोभा कुंभार या आठ महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर या भागामध्ये व्यावसायिक आणि नोकरदार लोकांची संख्या जास्त असल्यामुळे महिलांना घरगुती पदार्थ बनविण्यासाठी वेळ मिळत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व महिलांनी या भागामध्ये पापड आणि शेवई बनविण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. यांनतर सर्व महिलांनी ठराविक रक्कम एकत्र करून पापड बनविण्याची मशीन खरेदी केली. त्यांनतर पापड बनविण्यास सुरूवात केली असता या भागातील महिलांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यांनतर येथील काही महिलांनी शेवईचे मशीन देखील असावे, अशी इच्छा व्यक्त केली. या महिलांनी पापड बनविण्याच्या झालेल्या नफ्यामध्ये काही रक्कम एकत्र करून पुन्हा शेवईचे मशीन देखील घेतले. सध्या महिलांची पापड आणि शेवई बनविण्यासाठी दररोज गर्दी होत आहे. येथील महिलांच्या वाढत असलेल्या प्रतिसादामुळे पापड आणि शेवई बनविणाऱ्या महिलांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. तर इतर महिलांना पापड अथवा शेवई बनविण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत झाली आहे. यावेळी महिलांकडे पापड बनविण्याची सोय उपलब्ध झाल्याने महिलांचा घरी बनविण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत झाली आहे.कमी वेळेमध्ये आणि अतिशय कमी किंमतीत वस्तू उपलब्ध होत असल्याचे छाया दौंडकर यांनी सांगितले आहे. तर यापुढील काळामध्ये सर्व महिला एकत्र येऊन जागा उपलब्ध करत महिलांचा एक छोटासा कारखाना तयार करण्याचा आमचा मानस असल्याचे या महिलांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)