शिक्रापुरच्या खेळाडूंचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश

शिक्रापूर- शिक्रापूर आणि गणेगाव खालसा येथील शोतोकॉन कराटे अकादमीच्या खेळाडूंनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अठरा सुवर्णपदके पटकावीत यश संपादित केले आहे. रोहित सासवडे, रोहन पिंपरकर आणि कार्तिक सासवडे यांनी विजेतेपद तर नमिरा मुल्ला, त्रिशाली ढमढेरे आणि नेहा भांडवलकर यांनी उपविजेते पद पटकाविले आहे.
शोतोकॉन ग्लोबल जपान कराटे ऍकॅडमीच्या वतीने वाघोली पुणे येथे आयोजित सहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील शिकापूर आणि गणेगावचे विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : कराटे काता प्रकार – रिया चौरसीया, आदीत्य बोल्हाडे, अथर्व मोरे, गणेश दाते, अर्शलान शेख, सर्वेश खेबडे, रिध्दी पाटील, अबधुत पुंडे, कुणाल बागसकर यांना सुवर्ण पदक. तर मृणालीनी रायकर, वैष्णवी बैंडभर, शुभम शिंदे, रोहन पिंपरकर, सतिष घायल यांना रौप्य पदक. तसेच नमीरा मुल्ला, पुर्वा मुळे, त्रिशाली ढमढेरे, मोहीनी आघाड, नेहा भांडवलकर, अंकीता भुजबळ, समर्थ चौधरी, प्रणव भोसले, गौरव बोर्हाडे, यशराज इंगळे, दिप्ती पिंपरकर, निखील बाजंत्री, अभिजीत वाघमारे, आदीत्य बाघमारे, प्रज्वल गुंड यांना कांस्य पदक.
तर कराटे कुमिते प्रकारमध्ये – पूर्वा मुळे, नेहा भांडवलकर, कार्तिक सासवडे, रोहीत सासवडे, प्रणव भोसले, अथर्व मोरे, गौरव बोल्हाडे, अवधुत पुंडे, कुणाल बागसकर यांना सुवर्ण पदक. तर शांभवी मांढरे, अथर्व चौरसीया, यशराज इंगळे, रोहन पिंपरकर, सतीश धायल यांना रौप्य पदक तसेच नमीरा मुल्ला, रिया चौरसीया, त्रिशाली ढमढेरे, मोहीनी आघाव, अंकीता भुजबळ, रोहन सासवडे, आदीत्य बोल्हाडे, गणेश दाते, अर्शलान शेख, सर्वेश खेबडे, दिप्ती पिंपरकर, रिध्दी पाटील, आदीत्य वाघमारे, प्रज्वल गुंड, दीपक बेले, प्रसाद गदाद यांना कास्य पदक पटकाविण्यात यश आले आहे.
तसेच कराटे टिम काता प्रकार खुला गटमध्ये – चेतन पवार, शुभम शिंदे, गणेश दाते यांनी तृतीय कमांक पटकाविला आहे. सर्व विजेत्या खेळाडूंना सोमनाथ अभंग आणि प्रसाद गद्दे यांनी मार्गदर्शन केले तर सर्व यशस्वी खेळाडू, मार्गदर्शक शिक्षकांचे कराटे वर्ड फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम चव्हाण, संजय शिंदे, शिरूर बाजार समीतीचे संचालक बाबासाहेब सासवडे, युवा उद्योजक मंगेश सासवडे तसेच शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा. एन. बी. मुल्ला यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)