शिकार प्रकरणी नेमलेली चौकशी समिती फक्त ‘दिखाव्या’साठी : उद्धव ठाकरे

प्रातिनिधिक छायाचित्र

अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर राजकीय वर्तुळामध्ये पेटलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही सुरूच आहेत. आज या प्रकरणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधताना, अवनी वाघिणीच्या शिकारीची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती फक्त ‘दिखाव्या’साठी असल्याचे म्हंटले आहे. ‘ज्यांनी वाघिणीच्या शिकारीची सुपारी दिली त्यांनाच चौकशी समितीवर घेऊन निष्पक्ष चौकशी होऊ शकेल काय?’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवृत्त न्यायाधीशांमार्फत कमिटी बनवून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील केली.

यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा देखील समाचार घेतला. ‘सुधीर मुनगंटीवार यांनी काही वाघिणीला गोळ्या घातल्या नाहीत’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला पेचात पडणारा प्रश्न करताना ते म्हणाले की, ‘मोदींनी स्वतः जाऊन सर्जिकल स्ट्राईक केली होती का? तरीही त्यांना श्रेय देताच ना? मग आता हे ‘पाप’ स्वीकारताना पीछेहाट कशाला?’. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला मुख्यमंत्री आता कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)