शिकारी आणि वन मंत्र्यांमध्ये साटेलोटे 

सुधीर मुनगंटीवार मंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली

मुंबई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वाघ मारण्यातच जास्त रस आहे. ते मंत्री झाल्यापासून वाघांचा जीव जात आहेत. त्यातच महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये अवैधरित्या शिकारीचे प्रकार घडत आहेत. यावरून शिकारी आणि मंत्र्यांमध्ये साटेलोटे असण्याची शक्‍यता आहे, असा आरोप मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्‌टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

अवनी वाघिणीच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या ग्लोबल मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा संजय निरुपम यांनी केली. हा ग्लोबल मार्च मुंबईतील वरळी सीफेस ते शिवाजी पार्क असा काढण्यात येणार आहे. निरुपम म्हणाले, अवनीला ज्या पद्धतीने मारले, त्याचे समर्थन केले जात असून पुरावे नष्ट केले जात आहेत. त्यामुळे मंत्र्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवनीची हत्या झाल्यावर एक दिवसाने ओदिशामध्ये एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. पाच कोटी रुपये खर्च करुन राज्य सरकारने कुख्यात शूटरला आणून अवनीला मारले, असेही ते म्हणाले.

-Ads-

महाराष्ट्रात 2008 ते 2015 दरम्यान फक्त 14 वाघ मारले गेले. 2016 या एका वर्षात 16 वाघ मारले गेले, तर एकट्या 2017 मध्ये 21 वाघ मारले गेले. मुनगंटीवार वनमंत्री झाल्यावर वाघ मारण्याची संख्या वाढली. मुनगंटीवर यांचे वर्तन पाहून त्यांना प्राण्यांना मारण्यात रस आहे, असे वाटते, असा घणाघातही निरुपम यांनी केला.

सीबीआय चौकशी व्हावी 
अवनीची बॉडी असती तर नीट तपास झाला असता. अवनीला जाळून पुरावा नष्ट करण्यात आला. अवनीची हाडे काढून घेतली का, आपल्याला काही माहीत नाही. मुनगंटीवार जे बोलतात त्यावरुन ते शिकाऱ्यांसोबत काम करतात, असे वाटते. एक वाघासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात 50 हजार डॉलर मिळतात. या मोठ्या रॅकेटमध्ये मंत्री शामिल आहेत का? या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असेही निरुपम म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)