आता दररोज 450 जणांना शिकाऊ वाहन परवाना

पुणे – शहरातील वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असून दररोज येणाऱ्या अर्जांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ वाहन परवान्याच्या कोट्यात वाढ केली असून आता रोज 450 जणांना शिकाऊ वाहन परवाना वितरीत केला जाणार आहे.

सद्यस्थितीत आरटीओ कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने दरदिवशी 400 जणांना शिकाऊ परवान्याचे वितरण केले जात होते. मात्र, अर्जांची संख्या पाहाता मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे चालक-मालक तसेच अर्जदारांकडून वारंवार कोटा वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर कोटा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून शुक्रवारपासून (दि.14) याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना वाहन परवाना आवश्‍यक असल्याने आणि वाहतूक दंडाची रक्कम वाढल्याने लायसन्स काढणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे काही प्रमाणात नव्या निर्णयाचा फायदा नागरिकांना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)