शिंदे-पवार-ठाकरे यांच्यात गुफ्तगू !

सोलापूर, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे सोलापूरचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मंगळवारी सकाळी सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये एका बंद खोलीत गुफ्तगू झाल्याची माहिती पुढे आली आहे. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत मात्र सविस्तर तपशील समजू शकला नाही.

शरद पवार आणि राज ठाकरे काल प्रचाराच्या निमित्ताने सोलापूरच्या दौऱ्यावर होते. रात्री त्यांनी सरोवरामध्ये मुक्काम केला. मंगळवारी सकाळी ते आपापल्या ठिकाणी नियोजित कार्यक्रमासाठी जाणार होते. तेव्हा सकाळी लवकर सुशीलकुमार शिंदे हे पवार यांना भेटण्यासाठी सरोवरमध्ये आले. यावेळी माध्यम प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना संबंधितांच्या कक्षापासून खाली धाडण्यात आले. यानंतर उभयतांनी एका बंद खोलीत काही काळ चर्चा केल्याचे सांगण्यात आले. नेमकी चर्चा काय झाली हे समजू शकले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)