शिंदे कुटुंबीयांना एक लाखांची मदत सुपूर्द

रेडा- मराठा आरक्षणासाठीसाठी जलसमाधी आंदोलनात हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांच्या कायगाव (ता.गंगापूर) या गावी जाऊन आज (रविवारी) त्यांचे वडील दत्तात्रय शिंदे यांच्याकडे एक लाखंची आर्थिक मदत इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी सुपूर्त केली. इंदापूर येथे झालेल्या मराठा ठिय्या आंदोलनात माजीमंत्री हर्षवर्धन पाटील हे शनिवारी (दि. 28) संपुर्ण दिवसभर सहभागी झालेले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी एक लाख रूपयांची आर्थिक मदत हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज ही मदत शिंदे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या वतीने 21 हजार रुपयांची रोख मदत शिंदे कुटुंबीयांकडे देण्यात आली. याप्रसंगी गंगापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व गंगापूर बाजार समितीचे सभापती संजय जाधव, बाजार समितीचे उपसभापती शिवाजी बोडके, शेखर पाटील, सचिन देवकर तुषार चव्हाण, पवन घोगरे, प्रवीण पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)