पिरंगुट-सनी फाऊंडेशन पुणे व शिवसेना मुळशी तालुका यांच्या वतीने रविवारी (दि. 15) सुंदरबन लॉन्स मंगल कार्यालय घोटावडे फाटा शिंदेवाडी येथे भव्य नोकरी महोत्सव व कर्ज मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती माजी उपसभापती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी दिली.
मुळशी तालुक्‍यातील गरजू व बेरोजगार युवकांना आपल्याच परिसरातील नामांकित मल्टीनॅशनल औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी म्हणून 1000पेक्षा अधिक तरूणांना निमंत्रित केले असून तालुक्‍यातील जवळ जवळ 35 कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्याचे उद्‌घाटन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे करणार असून अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते आमदार रविंद्र मिर्लेकर राहणार आहेत. याप्रसंगी संपर्क प्रमुख सत्यवान उभे, शहर प्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनाचे जिल्हा प्रमुख, तालुक्‍यातील सर्व आजी माजी पदाधिकारी यांना निमंत्रित केल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश भेगडे यांनी दिली. तालुक्‍यातील सर्व तरूणांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे अवहान बाळासाहेब चांदेरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)