शिंदेबाह्मणेमळा येथे शिक्षण परिषद

ओतूर- शिंदेब्राह्मणेमळा (ता. जुन्नर) येथे चाळकवाडी व काळवाडी या केंद्रांची शिक्षण परिषद येथे नुकतीच पार पडली. या शिक्षण परिषदेचे नियोजन मुख्याध्यापक नवले व शिंदे मॅडम यांनी केले होते. यावेळी पिंपळवंडीचे सरपंच सोमनाथ माळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले.शिक्षण परिषदेत शंभर टक्के प्रगत शाळा भटकळवाडी, काळवाडी, गायमुखवाडी यांचा पिंपळवंडीचे सरपंच माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रगत वर्ग असणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. प्रगत वर्ग कसा करता येतो, याचे भाषा आणि गणित विषयांचे प्रात्यक्षिक गुंजाळ मॅडम व साबळे यांनी सादरीकरण उत्कृष्ट प्रकारे घेतले. पायाभूत चाचणी व अध्ययन स्तर दुसरी फेरी याचे विश्‍लेषण यावेळी करण्यात आले, त्याचबरोबर यावर सर्व शिक्षकांनी चर्चा घडवून आणली. कुटे यांनी सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याचे मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्ती निहाय अध्ययन-अध्यापनाचे वार्षिक नियोजन मार्गदर्शन केंद्रप्रमुख रत्ना शिरसाट यांनी केले. भोजनाची आणि चहापाणी व्यवस्था शाळा व्यवथापन समिती आणि शाळा यांनी उत्तम केली होती. शिक्षण परिषद यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक मारुती नवले यांनी केले, तर विकास माताडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)