शिंदेच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्‍वर केंदळे

भामाआसखेड – शिंदे गावच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्‍वर बबन केंदळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सारिका राहूल पानमंद यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्‍त झाले होते. त्यानंतर सरपंच सारिका झुंझुरके याच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यात ज्ञानेश्‍वर केंदळे यांचा एकमेव अर्ज आल्याने केंदळे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे ग्रामसेवक अतुल रावते यांनी जाहीर केले. यावेळी सारिका पानमंद, नामदेव पानमंद, अर्जुन पानमंद, सुनिता घनवट, गुलाब आघाणे, लिलाबाई मेंगळे, कविता गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते. तसेच काळूराम मिंडे, गोरख टेमगिरे, शांताराम केंदळे, अशोक गायकवाड, रमेश केंदळे, हिरामण केंदळे आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)