शिंदेगावच्या प्रियंका घनवट हिचा सत्कार

भामा आसखेड-शिंदेगाव (ता. खेड) येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष व सोसायटीचे संचालक सुनिल दत्तात्रय घनवट यांची मुलगी प्रियंका सुनील घनवट हिची राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेत महाराष्ट्रातून खुल्या प्रवर्गातील महिलांमधून 14वा क्रमांक आला. त्याबद्दल तिचे शिंदे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून कौतुक करण्यात येत आहे
भामचंद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित बुट्टेपाटील यांच्या हस्ते तिचा करण्यात आला. यावेळी सचिव तानाजी केंदळे, उपाध्यक्ष दत्ताञय पडवळ, खजीनदार मारूती पडवळ, प्राचार्य संजय बोरकर, संचालक विलास काळे, मोहन आंद्रे, दत्तात्रय घनवट व दत्तात्रय बुट्टेपाटील, संकेत घनवट, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्रियांका म्हणाली की, आई-वडील व आजी-आजोबा यांचे सहकार्य व प्रोत्साहन आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळेच हा यशाचा पल्ला गाठता आला. यासोबत राज्य कर निरीक्षकची मुख्य परीक्षा दिली असून राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीत समावेश झाला आहे. मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल 21 एप्रिल रोजी जाहीर झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)