शिंदवणे घाटात ट्रॅंकर उलटला

उरुळी कांचन- उरुळी कांचन ते जेजुरी या मार्गावर असणाऱ्या शिंदवणे घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक टॅंकर उलटला असून, त्यामधील एक व्यक्ती मृत झाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, चालक दिनेश दत्तू बिरासदार (वय 35, रा. लातूर) तेलाचा मोकळा टॅंकर (एमएच-12 पीक्‍यू 9159) घेऊन जेजुरीकडे चालला होता. आज (दि. 3) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तो शिंदवणे घट चढत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वरील टप्प्यावरून टॅंकर उलटला, त्यात दिनेश बिरासदार जागीच ठार झाला आहे.
उरुळी कांचन- जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाट हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या घाटाबाबत अनेकवेळा राज्य सरकारला निवेदने देऊनही घाटाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या घाट मार्गाने, जेजुरीच्या खंडोबाला, थेऊरच्या चिंतामणीला जाण्यासाठी भाविकांची गर्दी असते, तसेच हा मार्ग पालखीमार्ग असल्याने या मार्गाचे नूतनीकरण त्वरीत व्हावे अशी मागणी शिंदवणेचे सरपंच गणेश महाडिक आणि वळतीचे माजी सरपंच एल. बी. कुंजीर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)