शिंदवणेत कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

उरुळी कांचन- भाद्रपद बैल पोळा सण शेतकऱ्यांनी साजरा करताना शिंदवणे (ता. हवेली) येथे पुणे महात्मा कृषि विद्यापीठाच्या कृषिकन्यांनी बैल, शेती याबाबत मागदर्शन केले. बैलांच्या आरोग्याची काळजी घेत असताना त्यांना दिला जाणारा आहार, लसी, औषधे याबाबतचीही माहिती देण्यात आली. त्यामुळे येथे साजरा करण्यात आलेला बैलपोळा वेगळा ठरला. मंगळवारी (दि.10) येथील शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजा, हिरा-पन्ना, ढवळ्या-पवळ्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत श्रीरामजन्म उत्सव समितीचे ढोल पथक सहभागी झाले होते. बैलांना विविध रंगांनी रंगवून, शिंगांना पट्या, फुगे तसेच गळ्यात घुंगरांच्या माळा, अंगावर झूल टाकून सजविण्यात आले होते. यावेळी पुरणपोळीचा नैवद्य देऊन पूजा करण्यात आली. प्रगतशील शेतकरी अजित कांचन व किशोर मेमाणे यांच्यासह तुकाराम कांचन आदी शेतकऱ्यांनी बैल जोडीची मिरवणूक काढून ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. यावेळी सुप्रिया भिसे, श्रुती धुमाळ, निकिता बागल यासह अन्य कृषिकन्यांनी या उत्सवात सहभागी होत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मेमाणे फार्मचे किशोर मेमाणे, कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, शिंदवणे येथील मुकेश महाडिक आदी उपस्थित होते.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)