शिंदवणेतील 16 शेतकऱ्यांवर गुन्हा

File Photo

पुरंदर उपसा योजनेचा वॉल्व्ह बंद करण्यास अटाकव

लोणी काळभोर- पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाइपलाइनवरील वितरण कुंडाचा वॉल्व्ह संबंधित अधिकाऱ्यांना बंद करण्यास अटकाव करणाऱ्या शिंदवणे (ता. हवेली) येथील 16 लाभार्थी शेतकऱ्यांवर शासकीय कामांत अडथळा आणला म्हणून बुधवारी (दि. 5) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 2) घडला.
गणेश भाऊसाहेब महाडीक, शामराव लक्ष्मण माने, नानासाहेब सुदाम महाडीक, रामभाऊ बाबुराव महाडीक, सोमनाथ शंकर चव्हाण, गोकुळ मारूती महाडीक, दत्तात्रय दिनकर गाडेकर, गोरख वामन महाडीक यांच्यासमवेत इतर 7 ते 8 जणांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाच्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या शिंदवणे उपविभागाचे व्यवस्थापक रूपेश शंकर हंकारे यांनी फिर्याद दिली आहे.
हवेली तालुक्‍यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेचा कार्यभार रुपेश हंकारे यांच्याकडे आहे. जलसंपदा खात्याने
बिवरी (ता. हवेली) येथे मुळा-मुठा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे. तेथील पाण्याचा उपसा करून पाइपलाइनद्वारे हवेली, दौंड, पुरंदर व बारामती तालुक्‍यातील दुष्काळी व आवर्षणग्रस्त एकूण 63 गावचे शेतजमिनीसाठी पुरवण्यात येते. सध्या शिंदवणे गावच्या तलावापासून गेलेल्या पाइपलाइनमधून जात असलेल्या पाण्यातून पुरंदर तालुक्‍यातील माळशिरस व पारगाव या गावातील तलाव भरण्याचे काम सुरू आहे. रविवारी शिंदवणे वितरिकेवरील वॉल्व्ह शिंदवणे गावच्या लाभधारकांनी अनधिकृतपणे उघडून शिंदवणे येथील तळ्यात सोडल्याची माहिती मिळाल्यानंतर हंकारे हे कार्यालयातील मजूर डी. एम. तांबोळी यांच्यासमवेत तेथे 11. 30च्या सुमारास पोहोचले. तेथे लाभार्थी शेतकरी ऊभे होते. पाहणी केल्यानंतर त्यांना या पाइपलाइनवर असलेल्या वितरण कुंड क्रमांक 1 वरील वॉल्व्ह सुरू स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. हंकारे यांनी वॉल्व्ह कोणी सुरू केला याची विचारणा केली असता गणेश महाडीक यांनी आमचे गावच्या तलावात विनामोबदला पाणी भरण्यासाठी आम्ही तो वॉल्व्ह सुरू केला असल्याचे सांगितले. त्यानंतर हंकारे यांनी तांबोळी यांना वॉल्व्ह बंद करण्यास सांगितले असता सर्व लाभार्थी शेतकरी पुढे आले व सरकारी कामात अडथळा निर्माण करून वॉल्व्ह बंद करण्यास अटकाव केला. म्हणून त्यांच्याविरोधांत वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार हंकारे यांनी फिर्याद दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)