शिंगावर घेण्याची भाषा करणाऱ्यांना नगरकरांनी त्यांची जागा दाखवून दिली- आमदार संग्राम जगताप

आमदार जगताप यांचे राठोड यांना खोचक प्रत्युत्तर

नगर:शिंगावर घेण्याची भाषा करणाऱ्यांना नगरकरांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. आताही घोडा मैदान जवळच आहे,’ अशा शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर पलटवार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या खुलाशावर शिवसेनेच्या राठोड यांनी टीकास्त्र सोडले होते. आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“स्वार्थी कोण, हे नगरकरांना माहिती आहे. उपनेत्यांचे मंत्रीपद स्वार्थीपणामुळे अकरा महिन्यात गेले. राजकीय करिअरपेक्षा नगर शहराचा विकास महत्त्वाचा आहे. तो करतच आलो आहे, आणि यापुढेही तो तेजीने करत राहणार आहे. त्याचीच धास्ती उपनेत्यांनी घेतली असल्याचे जगताप म्हणाले.

काय म्हणाले होते अनिल राठोड ?

“राजकीय स्वार्थासाठी स्वतःचा राजकीय पक्ष दावणीला बांधला. खायचे आणि दाखवायचे दात, त्यांनी पक्षाला दिलेल्या खुलाशावरून लक्षात आले आहे. राजकारणातील सोयऱ्या-धायऱ्यांचे साटेलोटे पुन्हा एकदा नगरकरांना दिसले आहे. केडगाव हत्याकांडात यांची नावे उघड झाली आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयावर यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या पापातून वाचण्यासाठी भाजपपुढे लोटांगण घालणारे राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी शिवसेनेला बदनाम करत आहे. हे शिवसेना सहन करणार नाही. अंगावर आल्यावर शिंगावर घेऊ,’ असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला होता.

पाप झाकण्यासाठी राष्ट्रवादीचे भाजपसमोर लोटांगण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)