शिंगाडेवाडीत आनंदी बाजार उत्साहात

देऊळगावराजे- शिंगाडेवाडी (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने एक दिवसीय आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विक्रीसाठी शेतातील भाजीपाला,इतर शेतमाल, वडापाव, भजी, पाणीपुरी, चहा, भेळ यांसारखे खाद्यपदार्थ, फुगे आणि शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांनी आणल्या होत्या. या आनंदी बाजार पेठेत गावातील आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून आनंद घेतला. या आनंदी बाजारात 5 ते 6 हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विक्री करून व्यवहारातून खरेदी-विक्री, नफा-तोटा, मूल्यमापन, एकूण बाजार ही संकल्पना समजावी हा या उपक्रमाचा हेतू होता, असे शाळेचे मुख्याध्यापक किरण कोल्हे आणि सहशिक्षिका मनीषा पारखेड यांनी सांगितले. याप्रसंगी शाळा-व्यवस्थापन समिती शिंगाडेवाडीचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्या कार्यक्रमाला कदमवस्ती केंद्राच्या केंद्र प्रमुख धावडे, गटशिक्षणाधिकारी हिंगणे यांचे मार्गदर्शन लाभले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)