नगर – नगर मनमाड रस्त्यावरील शिंगवे नाईक येथे बस पलटी होण्याची घटना घडली असून या बसमधील 15 जण जखमी झाले आहेत. या घटनेची अधिक माहिती अशी कि दि. 25 मे रोजी रात्री 8.40 वाजण्याच्या दरम्यान शिंगवे गावाजवळ वळणावर भरधाव वेगाने चालणारी बस क्रमांक पी .5 4499 ही पलटी झाली. या बसमधील 10 ते 15 प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बसचालक(नाव व पत्ता माहिती नाही) याच्या विरूध्द फिर्यादी प्रवासी नरेश कुमार करवीरेणी(रा. हैदराबाद ,तेलंगणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल ए.आर.ढाकणे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)