शिंगवे ते भीमाशंकर कारखाना रस्त्याची चाळण

तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी

मंचर-शिंगवे ते पारगाव भीमाशंकर साखर कारखाना या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर असणारे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थ करत आहेत.
तालुक्‍यातील शिंगवे, देवगाव, लाखणगाव, काठापुर इत्यादी गावातुन शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थ पारगाव येथे मुख्य बाजारपेठ असल्याने ये-जा करत असतात. तसेच भीमाशंकर कारखाना असल्याने शिंगवे, जवळे, रांजणी, वळती, नागापुर, थोरांदळे, पिंपरखेड या गावातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी भीमाशंकर साखर कारखान्यात येत असतो; परंतु शिंगवे ते पारगाव कारखाना रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. रस्त्यावरून टायरगाड्या, उसाने भरलेले ट्रक, खासगी वाहने, भाजीपाल्याचे टेम्पो, वाळुची वाहतूक करणारे ट्रक यांची दिवसभरात ये-जा असते; परंतु खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रकचे टायर पंक्‍चर होणे, ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटणे हे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने शिंगवे ते पारगाव कारखाना रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)