शिंगणापूर निवासी क्रिडा प्रशालेच्या विकासासाठी समयबध्द कार्यक्रम राबविणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर- जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील निवासी क्रिडा प्रशालेच्या विकासाच्या दृष्टीने सर्वसामावेशक आराखडा तयार करुन समयबध्द कार्यक्रम राबविला जाईल अशा ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली. येथील पोलीस कवायत मैदानावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व संस्कृतीक स्पर्धाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

शिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रशालेचा दर्जेदार विकास करण्याच्या दृष्टीने लवकरच या शाळेस भेट देऊन तेथील अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन त्याबाबत करावयाच्या उपयायोजनांचा सर्वसमावेशक आराखडा निश्‍चित केला जाईल. त्यानुसार समयबध्द कार्यक्रम निश्‍चित करुन या प्रशालेचा सर्वांगिन विकास केला जाईल. अशी ग्वाही ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)