शाहू महाराज माणसाला माणुसकीने वागवणारा राजा

  • किरण साठे ः अकलूजमध्ये बहुजन ब्रिगेड संघटनेचे स्थापना

अकलूज – अकलूज येथील आण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासमोर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन ब्रिगेड संघटनेने छत्रपती राजर्षी शाहू महाराज वाचनालय आणि अकलूज शहर बहुजन ब्रिगेड शाखेचे उद्‌घाटन संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना किरण साठे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये फुले, शाहू, आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला जातीय दंगलीपासून वाचविण्यासाठी बहुजन ब्रिगेड संघटनेची स्थापना केली असून, अकलूज येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराज यांच्या नावानेवाचनालय सुरू केले आहे.
शाहू महाराजांची ओळख बहुजनांचे राजे म्हणून होती, त्यांनी कधीही जातीभेद केला नाही आणि तो त्यांना पटतही नसे, माणसाला माणुसकीनेच वागवणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची ख्याती होती, तसेच आपली ही संघटना फुले, शाहू, आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्व समजाला एकत्र करून पुरोगामी महाराष्ट्राची अस्मिता जनपण्याचे काम करण्याच्या उद्देशाने ही संघटना काम करत असल्याचेही किरण साठे यांनी सांगितले, यावेळी युवा जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मोरे, युवा तालुका अध्यक्ष आकाश होनमाणे, उपाध्यक्ष अजिनाथ साठे, संघटक सागर वाघमारे, कार्याध्यक्ष समाधान खुडे, सचिव ऋषिपाल बनसोडे, सागर लोखंडे, अकलूज शहर अध्यक्ष आनंद मिसाळ, विजय बनकर, अकलूज युवा अध्यक्ष कन्हैया ठोंबरे, संघटक उदय कांबळे, अकलूज शहर उपाध्यक्ष नवनाथ फुगे, कार्यध्यक्ष सागर काटे, सचिव भारत वाघमारे, उपाध्यक्ष पिंटू जगताप, अमोल गोरे, धवल कांबळे, रफिक सय्यद, सूरज मोहिते आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)