शाहू महाराजांमुळे शिक्षणाचे महत्त्व कळले – प्राचार्य आवारी

मंचर- छत्रपती शाहू महाराज यांनी महाराष्ट्र समतेच्या माध्यमातून लोक कल्याणकारी राज्य निर्माण केले. सर्व धर्म समभाव याप्रमाणे शाहु महाराजांनी शिक्षणाची महती सांगितल्याने अनेकांना शिक्षणाचे महत्त्व कळाले, असे प्रतिपादन प्राचार्य उत्तमराव आवारी यांनी केले आहे.
मंचर येथील महात्मा गांधी विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची 144 वी जयंती समता दिन म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य आवारी बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य माधव कानडे, पर्यवेक्षक व्ही. पी. पवार, रयत बॅंकेचे संचालक पंढरीनाथ बारवे, विलास बेंडे, स्वाती उपार, दिलीप चौधरी, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम कल्याणी लोंढे, साक्षी सोमवंशी, नेहा तायडे (विभागून) द्वितीय, सिद्धी गांजळे व शरण्या बुर्ले (विभागून) तृतीय क्रमांक पटकवला. विजेत्यांना प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसराची स्वच्छता केली. उपप्राचार्य माधव कानडे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन स्वाती उपार तर विलास बेंडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)