शाहूपुरी वाहतुक शाखा बंद

एसपींचे आदेश; पोलिस दलात खळबळ
सातारा,दि.11 (प्रतिनिधी)
गेली अनेक दिवस बंद होणार अशी चर्चा असलेली शाहूपुरी वाहतूक शाखा अखेर बंद झाली. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी याबाबत पो.नि.किशोर धुमाळ यांना गुरूवारी सायंकाळी आदेश दिले आहेत.

शाहूपुरी वाहतूक शाखेला अपक्षित असलेले संख्याबळ राज्य शासनाने मंजुर केले नव्हते. तसेच वाहतूक शाखेला लागणाऱ्या तांत्रिक बाबींची मंजुरीही शासनाने दिलेली नाही.

त्यामुळे शाहूपुरी वाहतूक शाखेला असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणुक रद्द केली आहे. तसेच या वाहतुक शाखेला असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मुळच्या ठिकाणी पुन्हा नेमणुक करावी.

असे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिलेत. एसपींच्या या आदेशामुळे शाहुपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांत मोठी खळबळ उडाली आहे.

शाहूपुरी वाहतुक शाखेला एकूण 41 कर्मचारी तर सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी असे संख्याबळ होते. तर मुळच्या ठिकाणी म्हणजे नेमके कुठे नेमणुक होणार याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांत संभ्रम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)