शाहूपुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

सातारा – शहरातील समर्थ मंदीर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. राम रघुनाथ साळुंखे, अमित विष्णू नलवडे (दोघे रा. मंगळवार पेठ,सातारा) अशी ताब्यातील दोघांची नावे आहेत. समर्थ मंदीर परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पो.नि. किशोर धुमाळ यांनी कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स. पो. नि. विठ्ठल शेलार, पो. ना. लैलेश फडतरे, स्वप्नील कुंभार,अमित माने यांनी जुगार सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी संशयीत दोघांना रोख रक्कम,जुगाराचे साहित्य,मोबाईलसह सतारा हजाराच्य ऐवजसह ताब्यात घेतले. पुढील तपास पो.ना. प्राजक्ता घोडके करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)