शाहूपुरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

सातारा,दि.9(प्रतिनिधी) – शहरातील समर्थ मंदीर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. राम रघुनाथ साळुंखे, अमित विष्णू नलवडे (दोघे रा. मंगळवार पेठ,सातारा) अशी ताब्यातील दोघांची नावे आहेत. या गुन्ह्याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल ओंकार यादव यांनी दिली आहे.समर्थ मंदीर परिसरात एका मंदीराजवळ पानटपरीच्या आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलिस नाईक लैलेश फडतरे, स्वप्नील कुंभार,अमित माने यांनी जुगार सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी संशयीत दोघांना रोख रक्कम,जुगाराचे साहित्य,मोबाईलसह सतारा हजाराच्य ऐवजसह ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस नाईक प्राजक्ता घोडके करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)