शाहूपुरीत सिनेस्टाईल महिलेचा विनयभंग

सातारा,दि.26(प्रतिनिधी) – शाहूपुरीत रविवारी एका महिलेचा सिनेस्टाईल विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत पिडीत महिलेने अज्ञात तिघांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिडीत महिला ही रविवारी रात्री आठच्या सुमारास चालत निघाली होती. त्यावेळी पाठीमागुन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिला थांबवले. त्यातील एकाने तिच्या अंगावरील ओढणी ओढली. तर दुसऱ्याने महिलेच्या अंगावरील वस्त्रे फाडली. रात्री आठच्या सुमारास झालेल्या या प्रकारमुळे परिसरात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. दाखल गुन्ह्याचा तपास हवालदार दबडे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
6 :cry: Sad
11 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)