शाहूपुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सातारा,दि.3(प्रतिनिधी) – शाहूपुरी येथील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.दरम्यान एटीएम रूममध्ये असलेला सायरन वाजल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला.याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सागर सुरेश घाडगे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्त साई आर्पाटमेंटजवळील भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम आहे. हे एटीएम मशीन शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एटीएम रूममध्ये असलेला सायरन वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. मात्र चोरट्यांनी एटीएम रूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा व इतर साहित्याची तोडफोड केली आहे. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचा पुढील तपास शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पो.हवा.भिल्ला करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)