शाहूपुरीची कोंडी

सातारा शहराचे महत्वाचे उपनगर असलेल्या शाहूपुरीची सध्या चारही बाजुने कोंडी झाली आहे. मुळात शाहूपुरी परिसरातील मोठा भाग त्रिशंकू असल्याने त्या भागाच्या समस्या कायम आहेतच. आता शाहूपुरीकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर नगरपालिकेने कोणती ना कोणती कामे काढली असल्याने शाहूपुरीत जायचे कसे हाच प्रश्‍न आहे. अर्कशालानगर आणि कोटेश्‍वर कॉलनी परिसरातील लोकांची अवस्था तर समुद्रातील बेटांवर अडकलेल्या लोकांसाऱखी झाली आहे.

कोटेश्‍वर मंदिराजवळाचा आणि अर्कशालेजवळचा हे दोनही पूल बंद असल्याने कोटेश्‍वर कॉलनी परिसरातील लोकांना भलामोठा वळसा घालून आपली दैनदिन कामे करावी लागत आहेत. या पुलांचे काम कधी पूर्ण होणार याचे उभर कोणाकडेही नाही. हा मुख्य रस्ताच बंद असल्याने शाहूपुरीतील लोकांना गडकर आळीमार्गे किंवा गजानन महाराज मंदिरमार्गे शहरात जावे लागते.

-Ads-

गडकर आळी रस्त्यावर त्यामुळे नेहमीच गर्दी आणि वाहतुकीची कोंडी पहायला मिळते. त्यातच आता गजानन महाराज मंदिर रस्ताही कामामुळे बंद असल्याने एखादे कोडे सोडवल्याप्रमाणे रस्ता शोधत इच्छित स्थळी जावे लागत आहे.रस्त्याची कामे करणाऱ्या मोठ्या मशिन्सनेही रस्ते अडवून ठेवले आहेत. ड्रेनेजच्या कामानंतर रस्ता व्यवस्थित न केल्याने लोकांना कसरत करावी लागत आहे ती वेगळीच. गेले अनेक महिने नागरिकांना सहन कराव्या लागत असलेल्या या कष्टाची जाणीव स्थानिक नगरसेवकाला आणि नगरपालिका प्रशासनाला नाही हेच खरे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)