शाहूनगर, भोसरीत मोबाईल हिसकावले

पिंपरी – शाहूनगर आणि भोसरी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी मोबाईलवर बोलत चाललेल्या तरूणांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेले.

शाहूनगर येथील घटनेप्रकरणी स्वरजीत श्रीकांत जोशी (वय-18) याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्वरजीत महाबली चौकातून मोबाईलवर बोलत चालला असताना दुचाकीवरून दोन जण त्याच्या जवळ आले. मागे बसलेल्याने त्याच्या हातातील 12 हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोसरीतील घटनेप्रकरणी सुनील अच्छेलाल चौहान (वय 24) याने भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तो सदगुरूनगर येथून पायी मोबाईलवर बोलत चालला होता. बिकानेर स्वीट मार्टसमोर दुचाकीवरून दोन जण त्याच्या जवळ आले. मागे बसलेल्याने त्याच्या हातातील 8 हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)