फिरव्यास येणाऱ्या नागरिकमध्ये नाराजी, कठोर कार्यवाहीची मागणी
सातारा, दि. 22 (प्रतिनिधी)-
सातारा शहरालगत असलेल्या शाहूपुरी ते माळवाडी मार्गवरील रस्त्याकडेला अज्ञात व्यक्तींकडून रिकाम्या दारुच्या बाटल्या टाकण्याचे प्रकार वांरवार घडत असल्याचे नागरिकाच्या निदर्शनास येत आहे. यामुळे या मार्गवर ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने घडणाऱ्या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील व शाहूपुरी या परिसरात अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी या मार्गवर फिराव्यास जातात. परिसराला नागरिकाची अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. विषेशत: ज्येष्ठ नागरिक व माहिला वर्ग फिरण्यासाठी हा मार्ग अधिक सुरक्षित असताना नव्याने अज्ञाताकडून या परिसरात दारुच्या बाटल्या बरोबरच कापडी चिंध्या टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. वास्तविक या परिसरात शाहूपुरी ग्रामपंचायतीने घंटा गाडीची सोय कली असतानाही रस्त्याकडेला कचरा टकणाऱ्यांबद्दल कठोर कार्यवाहीची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा या ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला एक प्रकारे गालबोट लावण्याचे कृत्य समाजकंटाकडून होत असल्याचे दिसून येत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा