शाहुपूरीत महीलांना चेन स्नॅचिंग प्रबोधन गरजेचे

सिसिटीव्ही असून अडचण नसून खोळंबा
(गुरूनाथ जाधव)
सातारा- महिलांनो मंगळसुत्र सांभाळा चेन स्नॅचिंग होतंय. असे शाहुपूरी व परिसरातील महिलांना सांगण्याची वेळ आली आहे. कोणत्याही सण समारंभाला महिला वर्गामध्ये मौल्यवान दागिने घालून फिरण्याची हौस अनेकांना महागात पडली असल्याच्या घटना घडल्या आहेत. काल सुध्दा जिल्हा परिषद कॉलनीमध्ये पन्नास हजार रूपयाचे मंगळसुत्र रात्री 9 च्या सुमारास धुम बाईकर्सनी हिसकावून नेले. वटपोर्णीमेच्या दिवशी देखील याच प्रकारे चेनस्नॅचिंग झाले होते.

यामुळे येथील महिलांमध्ये चेनस्नॅचिंग बाबत जनजागृती मोहिम राबविणे अत्यावश्‍यक बनले आहे. शाहुपूरी ग्रामपंचायत व पोलिसदलाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. चेनस्नॅचिंगच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी ग्रामपंचायत नेमकी कोणत्या उपायजोजना करते याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे. याबाबत महिलांचे प्रबोधन केल्यास अश्‍या प्रकाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. सातारा शहर तसेच जिल्ह्यामध्ये अश्‍या घटना घडत असतात मात्र यासाठी फक्‍त पोलिस प्रशासनावरतींच सर्वकाही सोपवून चालणार नाही यासाठी नागरिकांचे सहकार्य देखील महत्वाचे आहे. अशी माहिती शाहुपूरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, ग्रामरक्षक दल संकल्पनेच्या माध्यमातून पेट्रोलिंग तसेच गस्त घालणी कार्यक्रमाची आखणी केली. परतुं त्यामध्ये फारसे नागरिकांचे सहकार्य मिळत नाही. प्रत्येक नागरिकांनी आपल्या दारामध्ये लाईट लावणे आवश्‍यक आहे. विविध कॉलनीमध्ये गणेशमंडळाच्या माध्यमातुन सिसिटीव्ही बसविणे आवश्‍यक बनले आहे. मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून चेनस्नॅचिंग सारख्या प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केल्यास महिलांना त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल. यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.

नवनाथ जाधव शाहुपूरी ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले की शाहुपूरी परिसरातील कित्येक भागात अद्याप सिसिटीव्ही यंत्रणा बसविली नाही. जे आहेत त्यांची अवस्था एकदा तपासून पाहणे आवश्‍यक आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शाहुपूरी सिसीटीव्ही युक्त करण्याची संकल्पना साकारणे आवश्‍यक आहे त्यासाठी आमच्या आघाडीच्यावतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. शाहुपूरी मधील चेनस्नॅचिंगच्या प्रकारामध्ये होणारी वाढ याकरिता प्रबोधन करण्याच्या हेतुने ग्रामपंचायतीने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)