सातारा- सातारा शहरातील शाहूपुरीत बंद घराचा दरवाजा फोडून दीड लाखाची चोरी झाली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

शाहुपूरीतील फिर्यादी शकील ईस्माईल बन्ने (वय 52 , रा. बुधवार पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, शकील ईस्माईल बन्ने (वय 52, रा. बुधवार पेठ) यांचे बुधवार पेठेत घर आहे. सध्या या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते शाहुपूरी येथील पाहुण्यांच्या घरी झोपण्यास जातात. 31 ऑगस्ट ते दि. 03 सप्टेंबर या कालावधीत ते शाहुपूरी येथील घरी गेले नव्हते.

मात्र, दि. 3 सप्टेबंर रोजी घरी गेल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरटयाने दोन तोळ्याच्या बांगड्या, एक तोळ्याचे सोन्याचे कडे, दोन तोळ्याचे झुबके, दीड तोळ्याची मोहनमाळ, चांदीच्या बेड्या असा सुमारे 1 लाख 62 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला आहे. या चोरीचा तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)