‘शाहिद कपूर’ सर्वोत्कृष्ट अभिनेता

 

तर ‘आलिया भट’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

आयफा ऍवॉर्ड 2017 च्या रंगारंग सोहळ्यात शाहिद कपूर याने सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलिया भट हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला आहे. या दोघांनाही उडता पंजाब मधील भूमिकांबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नीरजा हा सोनम कपूरचा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.

 

अन्य पुरस्कारात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पिंकच्या अनिरूद्ध रॉय चौधरी यांची निवड झाली. बेस्ट सपोर्टिंग अभिनेता अनुपम खेर याला धोनी अनटोल्ड स्टोरीसाठी निवडले गेले. तर डेब्यू कलाकराचे ऍवॉर्ड दिलजीत दोसांझ याला उडता पंजाब साठी दिले गेले.

बेस्ट डेब्यू अभिनेत्री म्हणून दिशा पाटणीला धोनी अनटोल्ड स्टोरी बद्दल निवडले गेले. कॉमेडीचे ऍवॉड वरूण धवनला ढिशूमसाठी मिळाले तर निगेटिव्ह रोलचे बक्षीस जिम सरब याने नीरजासाठी पटकावले. आयफा वुनम ऑफ द इयरसाठी तापसी पन्नूची निवड झाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)