शाहिद कपूर दुसऱ्यांदा पप्पा बनला आहे. शाहिदची पत्नी मीरा राजपूतने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शाहिद आणि मीराचे हे दुसरे अपत्य आहे. यापूर्वी 25 ऑगस्ट 2016 रोजी या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्या मुलीचे नाव त्यांनी मीशा ठेवले आहे.

गेल्याच महिन्यात 26 ऑगस्टला मीशा 2 वर्षांची झाली. शाहिद आणि मीरा यांचा विवाह 7 जुलै 2015 रोजी छतरपूरच्या एका फार्महाऊसवर झाला होता. मीशाच्या जन्माची बातमी स्वतः शाहिदने आपल्या स्वतःच्या ट्‌विटर हॅन्डलवरून दिली होती. त्याच प्रमाणे मुलाचा जन्म झाल्याची बातमी अद्याप शाहिद किंवा मीराच्या कुटुंबीयांनी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

कदाचित त्यासाठी एखाद्या औपचारिक इव्हेंटचे आयोजन केले जाणार असावे. दोन महिन्यांपर्यंत मीराला बरोबर घेऊन हॉस्पिटलच्या वाऱ्या करणाऱ्या शाहिदचे फोटो व्हायरल होत होते. आपल्या पत्नीची एवढी काळजी बॉलिवूडमधील कदाचितच कोणत्याही ऍक्‍टरने घेतली असेल.

“पद्‌मावत’ हिट झाल्यापासून शाहिदने पूर्ण वेळ मीराच्या देखभालीसाठीच दिला होता. आता मुलाच्या जन्मानंतर शाहिद आणि मीराचा आनंद द्विगुणित झाला असणार. त्यांच्या या आनंदामध्ये त्यांचे फॅन्सही सहभागी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)