शाहिद कपूर याने कधी स्वप्नातही असा विचार केला नसेल की, जेव्हा त्याच्या घरी आनंदाची बातमी येणार तेव्हाच त्याच्यासोबत असे काही होईल. घडले असे की, शाहिद कपूरला 5 सप्टेंबर रोजी पुत्ररत्न झाला आणि त्याच दिवशी त्याचे ट्‌वविटर आणि इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले.

तुर्कीमधील एक हॅकर ग्रुपने शाहिदचे दोन्ही सोशल अकाऊंट हॅक करून त्यावर अनेक वादग्रस्त फोटो पोस्ट केल्या आहे. यात काही फोटो कतरिना कैफचे असून त्यावर हॅकर ग्रुपने “आय लव्ह यू कतरिना कैफ’ असे लिहिले आहे. दरम्यान, ट्‌वविटर आणि इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्यानंतर एका तासाने शाहिदने ते री-स्टोर केले. मात्र, तोपर्यत हॅकरने अंदाजे 20 ट्‌वीट्‌स केले होते.

हॅकर्स्‌ने शाहिदच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अलाउद्‌दीन खिलजीबाबतही एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, राजा अलाउद्‌दीन खिलजी हा बर्बर, क्रुर राजा नव्हता. जसा तुम्ही पाहिला. या पोस्टद्वारे त्याने “पद्मावत’ चित्रपटाकडे इशारा केला. ज्यात शाहिद कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)