शाहरूख परदेशातही सर्वात श्रीमंत अभिनेता 

शाहरूख खान सर्वाधिक कमाई करण्याबाबत जगभरातील अव्वल अभिनेता ठरला आहे. शाहरूखने हॉलिवूडचा स्टार टॉम क्रुज याला मागे टाकून यादीत अव्वल स्थान पटकावलेले आहे हे विशेष! जगातील 20 कलाकारांच्या यादीत शाहरूख पहिल्या क्रमांकावर असून, अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर आहेत. शाहरूखची एकूण सरासरी कमाई 750 दशलक्ष डॉलर आहे. अमिताभ यांची कमाई 425 दशलक्ष डॉलर आहे.
हॉलिवूडचा स्टार टॉम क्रुजची संपत्ती 550 दशलक्ष डॉलर आहे. तिसऱ्या स्थानावर जॉर्ज क्‍लूनी असून, त्याची संपत्ती 500 दशलक्ष डॉलर आहे. पाचव्या स्थानापासून मेल गिब्सन (425 दशलक्ष), जॅक निकल्सन (400 दशलक्ष), सिल्वेस्टर स्टॅलोन (400 दशलक्ष) आणि जॅकी चॅन (395 दशलक्ष) यांचे क्रमांक लागतात. शाहरूख सध्या ‘झीरो’ या चित्रपटात मग्न असून, त्यामध्ये त्याने एका बुटक्‍याची भूमिका साकारली आहे. बऱ्याच काळापासून शाहरूखचा नवा चित्रपट आलेला नसल्याने त्याची सद्दी संपली असल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र, शाहरूख अजूनही कमाईच्या बाबतीत तरी देशातच नव्हे तर परदेशातही आघाडीवर असल्याचे या यादीतून दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)