शाहरूखच्या पार्टीत आलिया-कतरिना दिसल्या एकत्रित

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरूख खान आणि गौरी खान यांनी दिवाळी पूर्वी ठेवलेल्या पार्टीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. शाहरूखचा बंगला “मन्नत’मध्ये झालेल्या या पार्टीत बॉलीवुडमधील अनेक सिलेब्स उपस्थित होते. या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या पार्टीत करीना कपूर, करण जोहर, काजोल, जॅकलिन फर्नाडिस, सारा अली खान, शाहिद कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ रॉय कपूर, राजकुमार राव, मलायका अरोरा, कतरीना कैफ और अर्जुन कपूर यासारख्या स्टार कलाकारांनी शिरकत केली. या पार्टीतील अनेक फोटोंवर चर्चा रंगत आहे. पण एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तो फोटो आहे, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांनी दिलेल्या एकत्रित पोजचा.

यात दोघींनी घातलेल्या काळया रंगाच्या ड्रेसमध्य त्या खूपच सुंदर दिसत होत्या. दरम्यान, कतरिनाचा ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरने आलियाला डेट करण्यास सुरूवात केल्यापासून दोघींमध्ये बिनसले होते. मात्र, हे फोटो पाहिले असता त्यात तथ्य नसल्याचे दिसून येते. तसेच कतरिना आणि आलिया सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कॉमेटही देत असतात.

दरम्यान, आलिया सध्या “ब्रह्मास्त्र’, “कलंक’ आणि “गली बॉय’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर कतरिना कैफचा “झिरो’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय कतरिना सलमान खानच्या “भारत’मध्येही मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)