शाहरुख खानला ऑस्करकडून निमंत्रण…

शाहरुख खान सध्या “झिरो’ मुळे खूपच चर्चेत आहे. ईदच्या मुहुर्तावर “झिरो’चा दुसरा प्रोमो रिलीज झाला आणि लोकप्रियही झाला. यामध्ये सलमानच्या कडेवर बसलेला बुटका शाहरुख खान दिसला होता. पण शाहरुखच्या सिनेमामध्ये सलमान काय करतोय. हा सिनेमा शाहरुखचा आहे की सलमानचा, असेही काही विचारू लागले. पण शाहरुखच्या या सिनेमात सलमान एक पाहुणा कलाकार असणार आहे. याच दरम्यान शाहरुइखसाठी आणखी एक खुषखबर आहे.

“ऑस्कर ऍकेडमी ऍवॉर्डस 2018’साठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण शाहरुखला मिळाले आहे. एकट्या शाहरुख खानलाच नव्हे तर आदित्य चोप्रा, गुनीत मोंगा, संगीतकार उषा खन्ना, सौमित्र चॅटर्जी, नसीरुद्दीन शाह, तब्बू, माधुरी दीक्षित, अली फजल आणि अनिल कपूरसारख्या अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांनाही ऍकेडमी ऍवॉर्डसच्या भव्य समारंभाचे निमंत्रण मिळाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऍकेडमी ऑफ मोशन आर्टस ऍन्ड सायन्सेसच्या वेबसाईटवर सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. ऑस्करच्या या समारंभामध्ये प्रत्येक देश, भाषा, वंश आणि स्त्री-पुरुष कलाकारांना कोणत्याही भेदभावाशिवाय सहभागी करून घेण्यासाठी हे अधिकृत निमंत्रण पाठवले जाते. ज्यांना निमंत्रण पाठवले आहे, त्यांच्यापैकी जे हे निमंत्रण स्वीकारतील त्यांनाच या समारंभाला उपस्थित राहता येऊ शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)