शाहरुख खानमुळे आयुष्य बरबाद झाले

शाहरुख खानच्या फॅनमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे, हे वेगळे सांगायलाच नको. पण शाहरुख खानमुळे आपले आयुष्य बरबाद झाले, असा सनसनाटी आरोप त्याच्या एका फॅनने नुकताच केला. खरे म्हणजे या फॅनचा आणि शाहरुख खानचा दुरान्वयाने काहीही संबंध नाही. शाहरुख या मुलीला ओळखतही नाही. इन्स्टाग्रामवर एक पेज आहे, जिथे आपले प्रेमाचे अनुभव शेअर केले जातात. या मुलीने या पेजवर आपला अनुभव शेअर केला आहे.

शाहरुखच्या रोमॅंटिक सिनेमांमुळे आपले आयुष्यच बरबाद झाले, असे तिने म्हटले आहे. त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या मुलींना आपला जीवनसाथी शाहरुख सारखाच असावा असे वाटायला लागते. लहानपणापासून शाहरुखचे सिनेमे बघितल्यामुळे आपण “परफेक्‍ट प्रपोजल’मिळण्याची वाट बघत बसल्याचे तिने म्हटले आहे.

शाहरुखप्रमाणे कोणीतरी व्हायोलिन वाजवणारा येईल, गुडघ्यावर बसून प्रपोज करेल, बोटात अंगठी घालेल वगैरे वगैरे…यामुलीचे एक अफेअर होते. तीन वर्षाच्या रिलेशनशीपमध्ये तिच्या बॉयफ्रेंडने तिला प्रपोज केलेच नाही. यामुलीनेच आपल्या मित्राला तशा खास प्रकारे प्रपोज केले. पण यावर तिचा मित्र नाराज झाला आणि म्हणाला आपली मुले अशी “फिल्मी’ असता कामा नयेत. पुढे या दोघांचे लग्न झाले की नाही, ते समजले नाही. मात्र शाहरुखच्या प्रभावाचा वास्तवात काहीही उपयोग नाही, हे तरी सूचित झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)