शाहरुख खानचे अलिबागचे फार्महाऊस आयकर विभागाकडून सील

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचे अलिबागचे फार्महाऊस आयकर विभागाकडून सील करण्यात आले आहे.  शाहरुखला अलिबागमध्ये बंगला बनवण्याच्या नादात पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागले. हा बंगला बनवण्यासाठी शाहरुखने नियमांचे उल्लंघन करत कागदांसोबत छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आता आयकर विभागाने त्याचे हेच फार्महाऊस सील करून त्याला टाळे ठोकले आहे.
शाहरुख हे फार्महाऊस बेनामी संपत्ती घेवाण-देवाणी अधिनियमांतर्गत अडकला आहे. शाहरुखने अलिबागमध्ये शेतीसाठी जमीन खरेदी केली होती. परंतु, त्याऐवजी त्याने एक मोठ्ठं फार्महाऊस उभारले. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला ९० दिवसांची वेळ देत ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)