शाहरुख खानचा “डॉन 3’लवकरच येणार

शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला “डॉन 3′ ची तयारी सुरु झाली आहे, असे या सिनेमाचे सहनिर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी जाहीर केले आहे. “डॉन 3’च्या कथेवर सध्या थोडा अभ्यास सुरु आहे. त्याच्या लेखनाचे कामही सुरु झाले आहे. लवकरच “डॉन 3’ची अधिकृत घोषणा केली जाईल, असे सिधवानी आणि फरहान अख्तरने सांगितले. फरहान अख्तर या वर्षाच्या सुरुवातीपासून खूपच बिझी आहे. पण लवकरच आपण “डॉन 3′ च्या कामात लक्ष घालणार आहोत, असे त्याने गेल्यावर्षी मार्च महिन्यातच सांगितले होते. फरहानच्या “डॉन’शृंखलेतील दोन्ही सिनेमांमध्ये शाहरुख अंडरवर्ल्डचा डॉन तर, प्रियांका चोप्रा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती. पहिला भाग 2006 मध्ये तर दुसरा भाग 2011 मध्ये रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन, प्राण आणि झीनत अमान यांच्या 1978 सालच्या गाजलेल्या “डॉन’चा रिमेक म्हणून या शृंखलेकडे बघितले जाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)