शाहरुख आणि अनुष्काचे नासामध्ये शुटिंग

बॉलिवूडचा किंग खानचा “झीरो’ हा यावर्षीचा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा सध्या याच सिनेमाचे शुटिंग अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासा’मध्ये करत आहेत. त्यांच्याबरोबर आर. माधवनही या शुटिंगसाठी “नासा’मध्ये गेला आहे. “नासा’मध्ये “झीरो’च्या अंतिम शेड्युलचे शुटिंग सुरू असल्याचे या सिनेमाशी संबंधित सूत्रांकडून समजले आहे. हे अंतिम शेड्युल 45 दिवसांचे असणार आहे. यापूर्वी शाहरुखने “स्वदेस’चे शुटिंग “नासा’च्या स्पेस स्टेशनमध्ये केले होते.

“झीरो’मध्ये जरी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत असले, तरी त्यांच्याबरोबर सलमान खान, श्रीदेवी, राणी मुखर्जी, काजोल, करिष्मा कपूर आणि अलिया भट हे स्पेशल ऍपिअरन्समध्ये दिसणार आहेत. “झीरो’मध्ये शाहरुख खान एका ठेंगण्या, बुटक्‍याच्या रोलमध्ये दिसणार आहे. तर अनुष्का एका सायंटिस्टच्या रोलमध्ये असेल. ती सातत्याने आपल्या प्रयोगांमध्ये फेल होत असते.

शाहरुखच्या या सिनेमाचे डायरेक्‍शन आनंद एल. राय करत आहेत. या सिनेमामुळे प्रेक्षकांना कमल हसनच्या “अप्पू राजा’ची आठवण येऊ शकते. “झीरो’ यावर्षी ख्रिसमसच्या पूर्वी 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)