शाहरुखला साकारायची आहे विराटची भूमिका

बॉलिवूडमध्ये सध्या असलेल्या बायोपिकच्या ट्रेंडमधील संजू, अजहर, एम. एस धोनी, मेरी कोम आणि भाग मिल्खा सारख्या सिनेमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशात आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनेदेखील बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जीवनावर आधारित चित्रपटात त्याला काम करायचे आहे, असे शाहरुखने म्हटले आहे. एका मुलाखतीत तो बोलत होता. यावेळी त्याच्यासोबत विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या समोरच आपली ही इच्छा व्यक्‍त केली.

शाहरुखची ही इच्छा ऐकल्यानंतर अनुष्काने त्याला विराटची भूमिका साकारायची असेल तर तुला त्याच्यासारखी दाढी वाढवावी लागेल, असे गमतीत म्हटले, असे झाल्यास झिरो ठरलेल्या शाहरुखला पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘झिरो’मध्ये शाहरुख एका बुटक्‍याच्या म्हणजेच ‘बऊआ सिंग’च्या भूमिकेत दिसत आहे. पण तरीही किंग खानची जादू काही झिरोला तारू शकलेली नाही. शाहरुखसोबतच या चित्रपटात झळकणाऱ्या कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माही आहेत. अपंगत्वं असूनही त्यावर मात करत वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनुष्काला “झिरो’मध्ये व्हिलचेअरवर बसल्याचे बघून विराट हेलावून गेला. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्काच्या भूमिकेची प्रशंसा केली. ‘अनुष्काच्या वाट्याला आलेली भूमिका ही जास्त आव्हानात्मक होती आणि तिने ती अतिशय सुरेखपणे निभावली आहे’, असं त्याने ट्‌विटमध्ये लिहिले होते.

त्याच्या या ट्‌विटनंतर ‘झिरो’ न भावलेल्या चाहत्यांनी उपरोधिक ट्‌विट करत त्याची खिल्ली उडवली. कोणी चित्रपटाच्या तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी मन्नत या शाहरुखच्या बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केल्याचा एक प्रतिकात्मक फोटो पोस्ट केला, तर कोणी झिरो किती वाईट आहे, याविषयी लिहीत विराटला धारेवर धरले. त्यामुळे पत्नीची प्रशंसा करणे विराटला महागात पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)