शाहरुखपुत्र आर्यनचे बॉलिवूड पदार्पण लवकरच

ज्या “स्टार किडस’च्या पदार्पणाची सिनेरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे, त्यामध्ये सर्वात आघाडीवर आहे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. आर्यन सध्या परदेशात फिल्ममेकिंगच्या अभ्यासक्रमामध्ये व्यस्त आहे. पण लवकरच तो आपला कोर्स पूर्ण करून बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सिद्ध होईल, असे स्वतः किंग खानने सांगितले आहे. नाही म्हणायला आर्यनने फिल्मी विश्‍वामध्ये पदार्पण केलेले आहे.

कोर्सच्या प्रोजेक्‍टचा एक भाग म्हणून त्याला एका शॉर्ट फिल्मसाठी असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून काम करायचे होते. ते त्याने व्यवस्थित केल्याचे समजते आहे. या प्रोजेक्‍टला आपल्या सहकार्यांपेक्षा अधिक चांगले सिद्ध करण्यासाठी आर्यनने आपल्या सिने रसिकांना आवाहन केले आहे. त्याने आपली शॉर्टफिल्म युट्युबवर पोस्ट केली आणि त्याला लाईक करण्याचे आवाहन केले आहे.

-Ads-

यशराजच्या बॅनरखाली “धूम 4’मध्ये आर्यनला घेतले जाण्याचे अंदाज व्यक्‍त केले जात आहेत. आर्यनल मीच लॉंच करणार असे करण जोहरने पूर्वी म्हटलेले होतेच. हा प्लॅन तयार होईपर्यंत आर्यनचा कोर्सही पूर्ण होईल आणि तो फिल्म टेक्‍नीकमध्ये अद्ययावत तंत्र शिकलेला असेल. त्यामुळे शाहरुखच्याबरोबर आता ज्युनिअर किंग खानलाही लवकरच पडद्यावर बघायला मिळेल, अशी आशा आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)