शाहरुखने सोडला राकेश शर्मांचा बायोपिक

भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा यांचा बायोपिक “सारे जहां से अच्छा’च्या कास्टिंगबाबत सध्या खूपच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्यांदा हा रोल आमिर खानला दिला गेला होता. पण आमिरने त्याला नकार दिला आणि शाहरुखचे नाव सुचवले होते. शाहरुखने आपल्या रोलची तयारी करायला सुरुवात केली होती. आता या सिनेमात “उरी’तील विकी कौशल काम करणार असल्याचे समजते आहे. या सगळ्या गोष्टींवर आमिर खानने पहिल्यांदाच तोंड उघडले आहे. शाहरुखने हा सिनेमा का सोडला ? असे जेंव्हा आमिरला विचारले गेले, तेंव्हा त्याला आश्‍चर्याचा धक्काच बसला.

शाहरुखने हा सिनेमा सोडला की नाही, याचा निर्णय ऑफिशियल घोषणेनंतरच व्हायला हवा. शाहरुखचे नाव आपण सुचवले होते हे खरे आहे मात्र शाहरुखकडून याबाबत काहीच खुलासा आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत शाहरुखकडून काही स्पष्टिकरण येत नाही, तोपर्यंत याबाबत काही बोलणे योग्य नाही, असे आमिर म्हणाला. “उरी’ हिट झाल्यावर विकी कौशलचे नाव चर्चेत आले. तेंव्हाच शाहरुखने सिनेमा सोडल्याचा निष्कर्श काढला गेला. पण शाहरुखने हा सिनेमा नक्की का सोडला, हे मात्र कोणीही सांगायला तयार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)